'या' झाडाची लागवड करून बना लखपती
- By - Team Agricola
- Jan 03,2025
'या' झाडाची लागवड करून बना लखपती.
https://youtube.com/shorts/KQHusUBGE3s
आजकाल बरेच तरुण चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. जर तुम्हालाही कमी वेळेत लखपती व्हायचं असेल तर एका झाडाची लागवड करून तुम्ही फक्त ५ वर्षांत श्रीमंत बनू शकता. तुम्ही मलबार कडुलिंबाची शेती करू शकता. तुम्ही या कडुलिंबाची झाडं लावल्यानंतर इतर पिकं घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही कमी जमिनीत उत्पादन आणि नफा जास्त मिळवू शकाल. मलबार कडूलिंब किंवा मेलिया डबिया या झाडाला अनेक नावांनी ओळखलं जातं. मेलियासी वनस्पती कुटुंबातून जन्मलेलं मलबार कडूलिंब निलगिरीप्रमाणे वेगाने वाढतं. त्याची रोपं लावल्यानंतर २ वर्षांत ४० फूट उंचीपर्यंत वाढतात. या प्रकाराची झाडे सर्व प्रकारच्या जमिनींत लागवड करता येते. यासाठी जास्त पाणी लागत नाही, कमी पाण्यात ही झाडं चांगली वाढू शकतात. ४ एकरांत मलबार कडुलिंबाची ५००० झाडं लावता येतात. अवघ्या पाच वर्षांत या झाडापासून लाकूड मिळते. झाड एका वर्षात ८ फूट उंच वाढते. या झाडांमध्ये कीड लागत नाही, त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. त्यामुळे तुम्हीही या झाडाची लागवड करण्याचा विचार करू शकता.