new-img

नोंदणी झाली पण शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद, उत्पादक शेतकरी संकटात

नोंदणी झाली पण शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद, उत्पादक शेतकरी संकटात

राज्यातील सोयाबीन उत्पादक  शेतकरी संकटात सापडला आहे. एका बाजुला सोयाबीनला मिळणारा कमी दर तर दुसऱ्या बाजूला सरकारच्या हमीभाव केंद्रावरील सोयाबीनची खरेदी बंद आहे. गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणीच असल्याचं समोर येतंय. बरदाना तुटवड्याने राज्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच बंद आहे. 
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन एव्हढी विक्रमी खरेदी झाली आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ २५ टक्केच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे . ७५ टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन विकायचे आहे .