new-img

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय, पीएम पीक योजनेत मोठी अपडेट

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय,  पीएम पीक योजनेत मोठी अपडेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कॅबिनेट बैठक झाली. त्यात नवीन वर्षात शेतकर्‍यांसाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहे. बैठकीत पीएम पीक योजनेतील अपडेट समोर आली असुन शेतकऱ्यांचा फायद्याचा निर्णय घेतला आहे.  आता पीएम पीक योजनेचे वाटप ६९५१५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. रक्कमेत सरकारने मोठी वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मंजूरी दिली आहे. त्यासाठी २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत ६९५१५ कोटी रुपयांचा खर्चास मंजूरी देण्यात आली. तर योजनेत आता तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पारदर्शकता आणि दावा निपटाऱ्यांचे प्रमाण झटपट करण्यात येईल.त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाला आणि विकासाला चालना मिळेल