जिवाणू खतांतून उत्तम परिणाम मिळवण्यासाठी खास टिप्स
- By - Team Agricola
- Dec 21,2024
जिवाणू खतांतून उत्तम परिणाम मिळवण्यासाठी खास टिप्स
https://youtube.com/shorts/5D41XnyR4x8
जिवाणू खतांतून उत्तम परिणाम मिळवण्यासाठी काही गोष्टींकडे वेळीच लक्ष द्यावे. नं १ बाजारातून जिवाणू खते आणताना त्यातून उपयुक्त जिवाणू प्रजाती संख्या असल्याची खात्री करावी. नं २ खात्रीलायक ठिकाणावरून खरेदी करावी, अन्यथा भेसळीची शक्यता असते. नं ३ विविध जिवाणू खते एकत्र वापरण्यायोग्य असल्याची काळजी घ्यावी. नं ४ वापरण्याची पद्धती, वेळ व प्रमाण पाकिटावर दिल्याप्रमाणे वापरावी. नं ५ बीज प्रक्रिया करताना योग्य व चांगले स्टिकर वापरावेत. नं ६ क्षारपड जमिनीत व इतर खराब झालेल्या जमिनीत वापर करावयाचा झाल्यास जिप्सम व वापरावे. नं ७ स्फुरद व इतर अन्नद्रव्य पिकास योग्य प्रमाणात पुरवावे. नं ८ जिवाणू खतातील जिवाणू अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी जमिनीत ओलावा आवश्यक आहे. नं ९ जमिनीत जिवाणू मिसळताना किमान 50 किलो शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून द्यावे.