घरबसल्या करा वारस नोंद?
- By - Team Agricola
- Jan 09,2025
घरबसल्या करा वारस नोंद?
https://youtube.com/shorts/UZKPl3PBlp0
वारस नोंद कशी करावी यासंदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर हा विडीयो पूर्णपणे नक्की पहा. शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता. ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. तसंच अर्जाचं स्टेटसही चेक करता येतं. बाकी अर्ज प्रक्रिया कशी करायची याची सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा.