टर्की पक्षिपालन ठरणार का फायदेशीर
- By - Team Agricola
- Dec 31,2024
टर्की पक्षिपालन ठरणार का फायदेशीर
https://youtube.com/shorts/wjQgLTch-sk
जर तुम्ही पशुपालक असाल तर तुम्ही टर्की पक्षिपालन करून चांगला नफा कमवू शकता. टर्की पक्षी हे आकाराने मोठे असल्यामुळे, त्यांना लागणाऱ्या जागेची गरजही कोंबड्यांच्या तुलनेने जास्त असते. खुराडे व कुंपण पद्धतीची घरे या प्रकारामध्ये मोकळ्या जागेभोवती कुंपण घालून पक्ष्यांना सांभाळले जाते. दिवसभर पक्षी मोकळ्या जागेत फिरत असल्यामुळे या भागात सावलीसाठी काही झाडे लावणे फायद्याचे ठरेल. टर्की ज्या जागेत मोकळे फिरणार आहेत, तिथे जर लुर्सन गवतासारख्या पिकांची लागवड केली, तर हे हिरवे गवत पक्ष्यांना खाण्यासाठी वापरता येते. टर्की पक्षी हे मुख्यत्वे मांसासाठी विकले जात असल्यामुळे, त्यांनी जास्तीत जास्त वजन कमीत कमी वयात कमविणे फायद्याचे ठरते. टर्की पक्ष्यांना नाताळ, नववर्ष व "थॅंक्स गिव्हिंग" या सणांना खूपच जास्त मागणी असते. त्यामुळे यातून चांगला नफा कमवण्याची संधी ही पशुपालकांना असते.