सेंद्रिय खताचे प्रकार कोणते आहेत तुम्हाला माहित आहे का?
- By - Team Agricola
- Jan 07,2025
सेंद्रिय खताचे प्रकार कोणते आहेत तुम्हाला माहित आहे का?
https://youtube.com/shorts/M9ic6T1mqa0
सेंद्रिय खताचे प्रकार कोणते आहेत तुम्हाला माहित आहे का? वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खताचे प्रकार सांगते. शेणखत: गाई-म्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. कंपोस्ट खत शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीव जंतूंमुळे विघटन होऊन त्यात कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. हिरवळीचे खत, लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात. गांडूळ खत, ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात. माशाचे खत, समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते. त्याला माशाचे खत म्हणतात. खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषांपासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात. यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणात असते.