शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत राहण्यासह पोटभर जेवणाची व्यवस्था
- By - Team Bantosh
- Sep 16,2025
शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत राहण्यासह पोटभर जेवणाची व्यवस्था
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 16 सप्टेंबर 2025 : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत राहण्यासह पोटभर जेवणाची व्यवस्था करणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत व्यवस्था करणारी 'कोल्हापूर बाजार समिती' ही राज्यातील पहिली बाजार समिती आहे.
करवीर, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल (निम्मा) असे साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र कोल्हापूर बाजार समितीचे आहे. समितीमध्ये जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून रोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतमाल घेऊन येतात.
भाजीपाला, कांदा-बटाटा, गूळ, फळांचा सौदा लवकर होत असल्याने बहुतांशी शेतकरी अगोदरच्या रात्रीच माल घेऊन येतात. अशावेळी त्यांच्या निवासासह जेवणाची कुंचबणा होते. अडत दुकानात रात्र काढावी लागते. यासाठी सभापती सूर्यकांत पाटील व संचालक मंडळाने समितीमध्ये त्यांच्या राहण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे.
शेतकरी ज्या अडत दुकानात माल घेऊन आला, संबंधित अडते शेतकऱ्यांना कुपन देईल. ते पाहून समिती व्यवस्थापन त्यांची व्यवस्था करणार आहे.