मंचर बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभावात तेजी
- By - Team Bantosh
- Sep 16,2025
मंचर बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याने बाजारभावात तेजी
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 16 सप्टेंबर 2025 : कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे रविवारी (दि.14) शेतमालाची एकूण 12 हजार 246 डाग इतकी आवक झाली. यामध्ये वाटाण्याला दहा किलोला 520 ते 1400 रुपये, गवारीला 650 ते 1200 रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. शेतमालाची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध प्रकारची तरकारीची आवक आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरूर या भागातून होत असते. मंचर बाजार समितीचे वैशिष्ट्य म्हणजे तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम याचा एसएमएस बंतोष अॅप या मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्याच्या मोबाईलवर लगेच कळतो. या विश्वासातून पाच तालुक्यांतील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येतात, असे सभापती थोरात यांनी सांगितले.