.jpg)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार
- By - Team Bantosh
- Sep 18,2025
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार
आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे, राजेश परजणे, नितीन औताडे यांच्या कुशल नेतृत्वामध्ये कोपरगांव बाजार समितीच्या शिरपेचात मानाचा तुरा
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 18 सप्टेंबर 2025 : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाजार समित्यांना वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात नाशिक विभागातून कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावत तिसऱ्या क्रमांकाचा मानाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून आपल्या कार्याचा राज्यभर ठसा उमटविला आहे.
उत्कृष्ट कामगिरी, पारदर्शक कारभार, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, त्यांच्या मालाची खरेदी विक्री सुलभ करणे, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, सलग 'अ वर्ग' भरीव वाढावा, शेतकऱ्यांना रोख पेमेंट, काँक्रीटीकरण, जनावरे, भाजीपाला, उपबाजार येथे शेतकरी वर्गाला दिलेल्या सुविधा आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या योजनांचा सखोल आढावा घेऊन बाजार समितीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून हा मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, उपाध्यक्ष श्री सुर्यवंशी, संचालक अॅडव्होकेट सुधीर कोठारी, श्री मानकर तसेच महिला संचालिका यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार कोपरगांव बाजार समितीला प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक साहेबराव लामखडे, खंडु फेपाळे, रामदास केकाण, प्रकाशराव गोर्डे, बाळासाहेब गोर्डे, ऋषीकेश सांगळे, रेवननाथ निकम, लक्ष्मणराव शिंदे, संजयराव शिंदे, शिवाजीराव देवकर, राजेंद्र निकोले, रावसाहेब मोकळ, अशोकराव नवले, रामचंद्र साळुंके, मिराताई कदम, माधुरीताई डांगे यांच्यासह सचिव नानासाहेब रणशुर उपस्थित होते.
आमदार आशुतोष काळे, विवेकभैय्या कोल्हे, राजेश परजणे, नितीन आंताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम व उपसभापती गोवर्धन परजणे व सर्व संचालक मंडळ हे बाजार समितीचा कारभार उत्कृष्ट व पारदर्शक करीत असून मागील तीन वर्षात अनेक उपक्रमाद्वारे बाजार समितीने आदर्श कामगिरी बजावली आहे.
याच पार्श्वभुमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने वेगळेपण सिद्ध करून तिसऱ्या क्रमांकांचा हा मानाचा बहुमान मिळविला आहे. या यशाबद्दल सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, सचिव नानासाहेब रणशुर यांनी सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी, खरेदीदार व्यापारी, हमाल मापाडी वर्ग व इतर बाजार घटकांनी वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले असुन या पुरस्काराने समितीच्या कार्याला नवी उर्जा मिळाली आहे.
यापुढेही बाजार समितीचे हिताचे कामे करून शेतकरी बांधवांच्या हितासाठी तत्पर व अधिक उपयुक्त व नावीण्यपुर्ण उपक्रम राबवून सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा पुरस्कार आमदार आशुतोष काळेसाहेब, विवेक कोल्हे, राजेश परजणे, नितीन औताडे यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेणारा ठरला असुन त्यांनी बाजार समिती संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.