बाजार समितीमुळे होणार शेतकऱ्यांची उन्नती - पणन मंत्री जयकुमार रावल
- By - Team Bantosh
- Aug 07,2025
बाजार समितीमुळे होणार शेतकऱ्यांची उन्नती - पणन मंत्री जयकुमार रावल
Bantosh : बंतोष न्यूज : दि. 7 ऑगस्ट 2025 : राज्य शासन हे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे. शेतकरी मेहनत करतो, कष्ट करुन पिक घेतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती उभी करावी असा शासनाचा संकल्प आहे.
बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्वपूर्ण राहील, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
मंत्री रावल म्हणाले, प्रत्येक तालुक्यात बाजार समिती किंवा उप बाजार समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. बळीराजाला केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे. राज्यात एकूण 305 बाजार समित्या तर 662 उप बाजार समित्या असून सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची उलाढाल या वेगवेळ्या बाजार समितींच्या माध्यमातून होते.