राज्यातील हळद बाजारात घसरण; आठवड्याभरात दीड हजाराने भाव कोसळले
- By - Team Bantosh
- Aug 09,2025
Bantosh : बंतोष न्यूज : दि. 10 ऑगस्ट 2025 : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. मागील आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. महिनाभरापूर्वी १४ हजारांचा उच्चांक गाठलेली हळद सतत घसरत असून शेतकरी विक्री रोखून धरत आहेत.
दरात सुधारणा होत नसल्याने अनेकांनी विक्री रोखून धरली असून बाजारातील हळदीची आवक घटत चालली आहे. हंगामाच्या सुरुवातीला चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; मात्र सध्या बाजारातील मागणी कमी आणि आवक नियमित असल्याने दर घसरत आहेत.
काय आहे कारण ?
मागणी कमी, आवक नियमित आणि निर्यातीत मंदी ही घसरणीची प्रमुख कारणे मानली जात आहेत. जर भावात लवकर सुधारणा झाली नाही, तर पुढील काही दिवसांत हळदीची विक्री आणखी कमी होईल, ज्याचा थेट परिणाम बाजारातील उपलब्धतेवर आणि खरेदीदारांच्या दरावर होईल, असे जाणकार सांगतात.
#Bantosh #बंतोष #App #BajarSamiti #बाजारसमिती #Farmer #शेतकरी #tomato #टोमॅटो #onion #कांदा #halad #हळद #बटाटा #कांदाबाजार #onionmarket