कृषी, पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार
- By - Team Bantosh
- Sep 24,2025
कृषी, पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार
पिकाची पेरणी ते विक्री प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होणार
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 24 सप्टेंबर 2025 : पणन व कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या समन्वयाबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी कृषी, पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना पेरणी ते विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळाल्याने शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच शेतमालाला भाव मिळेल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पणन व कृषी विभागातील प्रकल्प अधिक गतीमान पद्धतीने राबवावेत, अशी मागणी या बैठकीत केली.
बैठकीला सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव अ.सा.चंदनशिवे, अवर सचिव (पणन) अस्मिता पाटील, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे सहव्यवस्थापक विनायक कोकाटे, दूरदृश्यप्रणालीद्वारे स्मार्ट प्रकल्पाचे संचालक हेमंत वसेकर, संचालक (विस्तार) रफीक नायकवडी, महाराष्ट्र राज्य वखार मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, कृषी संचालक सुनिल बोरकर यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.