new-img

लासलगावची मिरची थेट परदेशातील बाजारपेठेत !

लासलगावची मिरची थेट परदेशातील बाजारपेठेत !

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 28 सप्टेंबर 2025 : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने नवा टप्पा गाठला आहे. लासलगाव बाजार समिती केवळ कांद्याच्या व्यापारी केंद्रापुरते मर्यादित न राहता द्राक्षे व मिरचीच्या विक्रीचेही महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे.

सन २००२ मध्ये लासलगाव बाजार समितीने खानगावजवळ तात्पुरते खरेदी केंद्र सुरू केले होते. सुरुवातीला येथे मुख्यतः द्राक्षांचे लिलाव होत असत. मात्र, २०१४ मध्ये आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने द्राक्षशेतीला मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी मिरची लागवडीकडे वळले.

शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीनुसार या केंद्रात मिरची विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आज हे केंद्र मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नंदुरबारसारख्या प्रमुख बाजारपेठांशी जोडले गेले आहे. विशेष म्हणजे, या केंद्रातील मिरची आता थेट लंडन, दुबई, कतार, ओमान, जर्मनी यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचली आहे.