new-img

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून दिलासा नाहीच ! पाहा चालू दर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातून दिलासा नाहीच !

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 28 सप्टेंबर 2025 : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याचा कालावधी हा अत्यंत आव्हानात्मक आणि चिंतेचा असा आहे. कांद्याचे दर अत्यंत कोसळले असून शेतकऱ्यांना उभारी मिळेल असे वातावरण कांदा बाजारात पाहायला मिळत नाही.

शनिवारी ( दिनांक २७ सप्टेंबर ) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये एकूण ८५ हजार २६८ क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये कांद्यास साधारण कमीत कमी ७०० रुपयांपासून ते १३०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

येवला बाजारात सरासरी ८०१ रुपये, लासलगाव -निफाड बाजारात १०७५ रुपये, नाशिक बाजारात ९०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार ११५० रुपये, वैजापूर बाजारात १००० रुपये तर रामटेक बाजारात पंधराशे रुपये दर मिळाला.

तसेच, लाल कांद्याला जळगाव बाजारात ६८७ रुपये, धाराशिव बाजारात १५५० रुपये, नागपूर बाजारात १४२५ रुपये तर शिरपूर बाजारात ८०० रुपये दर मिळाला. वाई बाजारात लोकल कांद्याला सरासरी १५५० रुपये दर मिळाला.

शनिवारी झालेल्या आवकेत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक साठ हजार क्विंटलची आवक झाली. तर उर्वरित ठिकाणी कमी अधिक प्रमाणात कांदा आवक झाली.