रत्नागिरी बाजार समितीच्या सभापतीपदी संदीप सुर्वे यांची निवड
- By - Team Bantosh
- Sep 26,2025
रत्नागिरी बाजार समितीच्या सभापतीपदी संदीप सुर्वे यांची निवड
Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 26 सप्टेंबर 2025 : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे संदीप सुर्वे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नव्याने स्थापन झालेल्या रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती चा कार्यकाळ दिनांक २७ जून २०२३ ते दिनांक २६ जून २०२८असा असणार आहे.
भाजपाचे सदस्य कमी असताना देखील संदीप सुर्वे यांची सभापती पदी वर्णी लागली आहे. प्रत्यक्ष सभापती निवडणुकीसाठी संदीप सुर्वे यांच्याविरुद्ध एक उमेदवारी अर्ज होता. परंतु सदर उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने संदीप सुर्वे हे बिनविरोध निवडून आले.
बाजार समितीत सभापती पदी संदिप हनुमंत सुर्वे तर संचालक म्हणून संचालक सुरेश भिकाजी सावंत, स्नेहल सचिन बाईत, गजानन कमलाकर पाटील, अरविंद गोविंद आंब्रे, मधुकर दिनकर दळवी, सुरेश मारुती कांबळे, हेमचंद्र यशवंत माने, स्मिता अनिल दळवी, विजय वासुदेव टाकले, नैनेश एकनाथ नारकर, रोहित दिलीप मयेकर, ओंकार संजय कोलते, प्रशांत यशवंत शिंदे, पांडूरंग जयराम कदम यांचा समावेश आहे.