new-img

हळद बाजारात तेजी ; शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा

Bantosh App : बंतोष न्यूज : दि. 24 सप्टेंबर 2025 : मागील काही आठवड्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या दरामुळे हळदी उत्पादकांना मोठा फायदा होत आहे, तर पुढील काळात हळदीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेतही दिसून येत आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राज्यासह दक्षिण भारतातील मसाला बाजारपेठेत हळदीची मागणी वाढल्यामुळे बाजारभावाला बळ मिळाले आहे.

खरीप हंगामात घेतलेल्या हळदीला वाशिमसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उच्च दर मिळत आहेत. प्रतिक्विंटल ९ हजार ८०० ते ११ हजार ३५० रुपये इतका उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण आहे.

वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा आणि मानोरा या बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया वेगात सुरू आहे. मागणी अधिक असल्याने पुढील काळात हळदीच्या दरात अजून वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे.